Breaking News

चांदपीर बाबा यात्रा उत्सवास प्रारंभ


नेवासा तालुक्यातील चांदा येथील जागृत ग्रामदैवत चांद्पीर बाबा यात्रा उत्सवास प्रारंभ झाला असून सायंकाळी 7 वा. गंगेवरून कावडीने आणलेल्या पाण्याने बाबाला स्नान घालण्यात आले. तसेच दि 20 एप्रिल रोजी ग्रामस्थांच्या वतीने मलिद्याचा नैवद्य अर्पण करण्यात येईल.सायंकाळी 7 वाजता चांदा ग्रामस्थांच्या वतीने वाजत गाजत चादर मिरवणूक होऊन चादर बाबाला अर्पण करण्यात येईल रात्री 9 वाजता छबिना मिरवणूक होईल. 

नंतर शोभेचे दारूकाम होऊन फटक्यांची आतिषबाजी होईल. यात्रा उत्सव काळात गढीवर भव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात येते नेवासा तालुक्यातील अनेक भाविक यात्रे निमित्त बाबाच्या दर्शनाला येतात. खेळणी वाले मिठाई वाले राहाट पाळण्यावाले यांनी आपापली दुकाने यात्रेत आणून यात्रेची शोभा वाढवावी व सर्वांनी यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन चांदा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.यात्रा उत्सव काळात कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सोनई पोलिसांचा चोख बंदोबस्त राहतो.