‘त्या’ घटनेचा देशभक्ती सेवा मंचने केला निषेध
कोपरगाव : आसिफा बकरवाल या ८ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार करून तिची काही नराधमांनी निर्घृणपणे हत्या केली. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा येथील देशभक्ती सेवा मंच्यावतीने निषेध करण्यात आला.
यासंदर्भात तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आले. या म्हटले आहे, की ही घटना खूप भयावह आहे. या मुलीला न्याय मिळावा, म्हणून भारत सरकारने यातील आरोपींना कोणत्याही प्रकारे दया न दाखवता त्यांना मृत्यृदंडच देण्यात यावा. सदर पिडीतेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी. या कटुंबाचे करत त्यांना न्याय मिळवून द्यावा.
यावेळी देशभक्ती सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र जगताप, किशोर चोरगे, नानासाहेब मोरे, नितीन शिंदे, किशोर काळे, सचिन जाधव, अल्ताफ शहा, अमित आगलावे आदींसह स्थानिक नागरीक उपस्थित होते.