अशोक उद्योग, शैक्षणिक संकुलामध्ये महात्मा फुले जयंती साजरी
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले हे सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन त्या माध्यमातून अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रध्दा निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलांना शिक्षणाची दारे उघडी केली. सामाजिक समता, न्याय व बंधुतेसाठी जीवन समर्पित केले. पाणी
अडवा, पाणी जिरवा सारखा मंत्र देवून त्यांनी शेतकर्यांच्या जिवनात बदल घडविला. त्यांचे कार्य हे अविस्मरनिय व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.
अशोक उद्योग समुह व अशोक शैक्षणिक संकुलाच्यावतीने अशोक कारखाना कार्यस्थळावर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी मुरकुटे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. प्रारंभी मुरकुटे यांच्यासह अशोक कारखान्याचे चेअरमन सोपान राऊत, व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे, कार्यकारी संचालक लक्ष्मण गाढे तसेच संचालक मंडळाच्या सदस्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
अशोक पॉलिटेक्निक, अशोक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भास्करराव गलांडे पाटील आय.टी.आय, अशोक आयडियल स्कूल व अशोक इंग्लिश मेडियम स्कूल या शैक्षणिक संकुलातही महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शैक्षणिक संकुलाच्या समन्वयिका मंजूश्री मुरकुटे, माजी सभापती
सुनिता गायकवाड, प्रा. अभिजीत पटारे, प्रा. डॉ. समीर सय्यद, प्रा. रईस शेख, प्रा. माधुरी चोळके यांच्यासह अध्यापक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.