पाथर्डी , शहर प्रतिनिधी - वाढत्या उन्हाची तीव्रता व पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने जुने बस स्थानकात प्रवाशांसाठी व नागरिकांसाठी मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे . सामाजिक बांधिलकी जपत मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे. ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री यांच्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले .याप्रसंगी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके ,नगरपालिकेचे गटनेते नंदकुमार शेळके ,माजी उपनगराध्यक्ष बंडुशेठ बोरुडे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे नगरसेवक बंडू पाटील बोरूडे, नामदेव लबडे ,सिताराम बोरुडे, चाँद मनियार, अॅङ. प्रतिक खेडकर ,अजय भंडारी ,किशोर डांगे, लालाभाई शेख , दिलीप बोरुडे ,आगारप्रमुख सुहास तरवडे ,कामगार संघटनेचे डी.जे अकोलकर ,अन्सार शेख, बाळासाहेब सोनटक्के ,अंबादास शिरसाठ आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष नासिर शेख की, एकात्मता रुजवून बुलंद भारत घडवण्याच्या उद्दिष्टात हातभार लावण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असतो . काही भरकटलेल्या मुस्लिम बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सामाजिक बांधिलकीचे भान जपण्यासाठी सामाजिक कार्यातून आम्ही त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो . उन्हाळ्यातील प्रवाशांची व नागरिकांची पिण्याची पाण्याची अडचण लक्षात घेऊन आम्ही सर्व समाज बांधव एकत्रित आलो व मोफत पाणपोईची संकल्पना मांडली. सर्वांनी एक मुखी होकार देऊन तन-मन-धनाने सहकार्य केले .सामाजिक बांधिलकी म्हणून यापुढेही आम्ही कार्य करत राहू .कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुन्नाभाई खलिफा, अमजद आतार ,जमीर आतार, जुनेद पठाण, आसीफ पठाण, सिकंदर शेख आदींनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक हुमायून आतार यांनी तर परवेज मणियार यांनी सुत्रसंचलन केले तर जुनैद पठाण यांनी आभार मानले
मुस्लिम बांधवांकडून पाथर्डी शहरात मोफत पाणपोई
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:41
Rating: 5