भातकुड़गांव (प्रतिनिधी) - सर्वांचा आदर करणे हीच शिकवण साधु संतांची आहे. कोणत्याही धर्म ग्रथांत मानवतेची शिकवण देतात. जात, पंथ, धर्म यांच्या शिकवणीने मानवाचे कल्याण होते. एक हरी भक्त बेचाळीस कुळाचा उध्दार करतो. एक वक्ता परीसराचा नावलौकिक वाढु शकतो. सेवा ही भावनेतून केली तर ज्ञान मिळते. त्यासाठी निस्वार्थ सेवेची गरज असते. कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या समाजातील व्यक्तीच्या या मातृभुमीच्या सेवेशी प्रामाणिक राहणारी व्यक्तीच भागीदार असतात.असे प्रतीपादन सप्ताहातील दुसरे पुष्प गुंफताना अशोक महाराज पांचाळ यांनी केले. शेवगांव नेवासा राजमार्गवरील भायगांव येथे आयोजित सुवर्णमहोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहात महाराज बोलत होते .किर्तनातुन यापुढे पारंपारिक चरीञाबरोबर समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे. संगती आणि पंगती या देवांच्या सुख निर्माण करतात. तर नुसत्या संगती व पंगती या आनंद निर्माण करू शकत नाही. त्यासाठी भेदाभेद नष्ट झाला पाहीजे. परमार्थ हे जबाबदारीचे काम आहे. ते प्रामाणिक पार पाड़णे हेच आनंद निर्मीतीचे साधन आहे यावेळी गहीणीनाथ महाराज आढाव ,दत्ताञय महाराज कुलट, महेश महाराज शेळके ,अविनाश महाराज लोखंड़े, प्रतीभा महाराज शेळके, माजी चेअरमन जनार्धन लांड़े ,शेषराव दुकळे, सदाशिव शेकड़े,राजेन्द्र आढाव , दिगंबर शिलेदार, दगड़ु दुकळे, हरीभाऊ महाराज आकोलकर, शिवाजी लांड़े, जगन्नाथ आढाव, नानासाहेब दुकळे, एकनाथ दुकळे, पंढरीनाथ लांड़े, सखाराम शेकड़े, राजेन्द्र दुकळे, माणिक शेकड़े, पञकार शहाराम आगळे, विजय खेडकर, केशव आढाव, शिवाजी आवारे, जनार्धन लोंढे, बाळासाहेब दुकळे, गोरक्षनाथ काळे, संदिप लाड़े, गंगाराम नेव्हल, रमेश आढाव, अनंत देशपांडे, मुरलीधर आढाव, विठ्ठल आढाव, बापुराव दुकळे, मुरलीधर कोलते,कैलास लांड़े, हरीचंद आढाव सुर्यभान विखे यांच्या सह परीसरातील भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मातृभुमीच्या सेवेशी प्रामाणिक राहणे म्हणजेच परमार्थ होय - अशोक महाराज पांचाळ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:35
Rating: 5