शिर्डी : साईबाबा संस्थानच्या साईबाबा रूग्णालयाकरीता नवीन अद्यावत कॅथलॅब मशिन खरेदी करण्यात आले आहे. सध्याचे जुने मशिन काढून त्याठिकाणी नवीन मशिन बसविण्यात येणार आहे. त्यामुळे दि. १४ ते दि. २९ या कालावधीत कॅथलॅब विभाग बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली. या कालावधीत कॅथलॅब मशिनवरील प्रोसीजर्स व्यतिरीक्त कार्डीओलॉजी विभागाची इतर कामे सुरू ठेवण्यात येणार आहेत. तरी दि. १४ एप्रिल ते दि. २९ एप्रिल ८ याकालावधीत कॅथलॅब विभागातील नियमित होणा-या हृदयशस्त्रक्रिया व प्रोसीजर्स होणार नाहीत, असे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.
साईसंस्थानची कॅथलॅब मशिन बंद राहणार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:59
Rating: 5