Breaking News

कल्याणकारी योजनांच्या प्रसारासाठी पत्रकारांचा सहयोग महत्त्वाचा -द्विवेदी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी पदाचा पदभार नुतन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्विकारला असता प्रेस क्लबच्या वतीने त्यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला. पत्रकारांनी केलेल्या सत्काराने ते भारावले.

दोन दिवसापुर्वी जिल्हाधिकारी अभय महाजन यांची पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप सचिव म्हणून मुंबई येथे बदली झाली. महाजन यांच्या जागी वाशिमचे जिल्हाधिकारी असणारे द्विवेदी यांची नियुक्ती झाल्याचे आदेश जारी झाले होते. त्यानुसार त्यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सुत्रे घेतली. अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे स्विकारताच प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. त्यांना परीसस्पर्श व डिस्कवरी अहमदनगर ही पुस्तके भेट देण्यात आली. प्रेस क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत अभियंता असणारा जिल्हाधिकारी जिल्ह्यास मिळाला असून, त्यामुळे विकासाचे व योजनांचे अभिसरण अधिक गतीने होणार असल्याचा विश्‍वास ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, विकासाच्या व लोककल्याणकारी योजनांचा प्रार होण्याबाबत पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रगतशील विचारांचा जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. विकास प्रक्रिया गतीमान करताना कल्याणकारी योजनांचा प्रसाराच्या बाबतीत पत्रकारांचे सहयोग महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, उप जिल्हा निवडणुक अधिकारी अरुण आनंदकर, मोहनीराज लहाडे, दीपक ओहोळ, गणेश हापसे, अमित आवारी, संदिप कुलकर्णी, सुशील थोरात, साजिद शेख, राजू खरपुडे, विक्रम लोखंडे आदि उपस्थित होते. तसेच यावेळी मावळते जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निरोप देण्यात आला.