महामानव फुलेंमुळेच महिला उच्च पदांवर कार्यरत : डॉ. विखे
राहाता प्रतिनिधी : स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून स्त्रीयांना शिक्षण देण्याचे काम महात्मा ज्योतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केले. क्रांतिकारी महामानव ठरलेल्या या दाम्पत्यामुळेच आज देशात महिला विविध क्षेत्रात उच्च पदावर पुरुषांच्याबरोबरीने आहेत, असे प्रतिपादन तालुक्याचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी केले.
राहाता येथे शिवाजी चौकात महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तालुक्याचे युवा नेते डॉ. विखे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना डॉ. विखे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंद सदाफळ, साहेबराव निधाने, सचिन मेहेत्रे, सोपान सदाफळ, रघुनाथ बोठे, स्वप्नील गाडेकर, पोपटराव कोल्हे, भागुनाथ गाडेकर, कैलास सदाफळ, राजेंद्र निकाळे, मिलिंद बनकर, रामा तात्या गाडेकर आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मेजर भानुदास गाडेकर होते.
डॉ. विखे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आदी थोर पुरुषांमुळे आपल्या देशाची संस्कृती चांगली राहिली आहे. त्यांच्या विचारांचे अनुसरण समाजातील प्रत्येक घटकाने केले पाहिजे. थोर पुरुषांच्या जयंत्या डीजे न वाजवता गरजु घटकांना आपल्या संघटनेच्या माध्यमातून कसा फायदा होईल, हे पाहणे गरजेचे आहे. यावेळी साहेबराव निधाने, मोहनराव सदाफळ, बाबासाहेब गाडेकर यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. यावेळी नगरसेविका सविता सदाफळ, मनिषा बोठे, अनुराधा तुपे, नगरसेवक विजय सदाफळ, लता मेहेत्रे, शालिनी जेजूरकर तसेच महात्मा फुले युवा मंच सर्व सदस्य शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.