त्या’ बंधाऱ्यांमुळे शेतक-यांच्या जीवनात समृध्दी : आ. कोल्हे
कोपरगांव : प्रतिनिधी - माजीमंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कारखाना कार्यक्षेत्रात व मतदारसंघात ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमाला प्राधान्य देत सर्वप्रथम संजीवनीमार्फत हिंगणी त्यानंतर मंजुर व सडे येथे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधले. ते बंधारे आज शेतक-यांच्या जीवनात समृध्दी फुलवित आहेत, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील श्रीक्षेत्र मंजुर येथे गोदावरी नदीवर संजीवनी कारखान्याच्यावतीने बांधण्यांत आलेला मंजुर बंधारा आॅक्टोबर २०१७ मध्ये आलेल्या पुरामुळे फुटला. या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभाग नाशिक यांच्यास्तरावरही बैठक घेऊन त्याच्या दुरूस्तीसाठी लघुपाटबंधारे विभाग संगमनेर मार्फत यंत्रसामुग्री देण्यात आली. त्याचा शुभारंभ सोमवारी आ. कोल्हे व श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवानंदगिरी महाराज यांच्या हस्ते विधीवत पुजनाने झाला. त्यावेळी आ. कोल्हे बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, की मंजुर बंधारा २०१७ मध्ये पुराच्या पाण्यामुळे फुटला. त्यामुळे आजुबाजूच्या शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. त्याच्या दुरूस्तीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात आले. विशेष सहायातून यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्यात आली. तेव्हा परिसरातील शेतक-यांनी या कामासाठी ट्रॅक्टर तत्सम वाहने देऊन बंधारा दुरूस्तीसाठी सहकार्य करावे.
यावेळी संजीवनी कारखान्याचे संचालक मनेश गाडे, अशोक भाकरे, भास्करराव तिरसे, शे तकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, माजी उपसभापती वैषाली साळूंके, गोसावीबाबा, मांजरे, यांत्रिकी विभागाचे सहायक अभियंता भाबड, शाखा अभियंता राऊत, किशोर बैरागी, नवनाथ भवर, बाळासाहेब वाघ, अण्णासाहेब साळूंके आदींसह परिसरातील विविध संस्थांचे आजी माजी सदस्य, लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.