Breaking News

अजनुज-पेडगाव दरम्यान हायड्रोलीक बंधार्‍याची मागणी


भिमा नदीवर अजनुज-पेडगाव दरम्यान गोदावरी पद्धतीचा हायड्रोलीक बंधारा करण्याची मागणी बबनराव पाचपुतेंनी जलसंपदा गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. अजनुज-पेडगाव दरम्यान भीमा नदीचे पात्र खोल व रुंद आहे. सिद्धटेकपर्यंत उजनी धरणाचे बॅक वॉटर असते, मात्र त्याचा वापर करता येत नाही. हा गोदावरी पद्धतीचा हायड्रोलीक बंधारा झाल्यास तालुक्यातील 15 गावांना याचा फायदा होईल, या सर्व बाबींचा विचार करता हा बंधारा व्हावा, ही मागणी पाचपुतेंनी केली आहे. भीमा पट्ट्यातील गावांना हा बंधारा वरदान ठरेल, असा विश्‍वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.