Breaking News

भामा-आसखेड मधून भीमा नदीत पाणी; पाचपुतेंच्या पाठपुराव्यास यश पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा

तालुक्यातुन वाहणार्‍या भीमा नदीत भामा-आसखेडचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी प्रशासकीय पातळीवर केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेऊन भीमा नदीत 850 ते 900 क्यूसेकने काल पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. 

उपसभापती प्रतिभा झिटे, रमेश गिरमकर, लक्ष्मण नलगे, माजी जि. प. सदस्य सुरेश क्षीरसागर, श्रीकांत मगर, दत्तात्रय गायकवाड, रघुनाथ गिरमकर, गणपत परकाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, भीमा नदीच्या भामा-आसखेडचे पाणी सोडल्यास भामा काठच्या गावांना त्याचा मोठा फायदा होईल. प्रामुख्याने तालुक्यातील कौठा, सांगवी, गार, अरवी-अनगर, पेडगाव, अजनुज, आनंदवाडी, चोराचीवाडी, चिखलठाणवाडी, शेडगाव, टाकळी कडेवळीत, पवारवाडी आदी गावांना हे पाणी दुष्काळात वरदान ठरतील या उद्देशाने ही मागणी पाचपुतेंनी वरिष्ठ पातळीवर केली होती.