Breaking News

धाकाधकीच्या जीवनात तणावमुक्त जीवन जगण्याची कला आत्मसात करणे आवश्यक - डाॅ धनंजय वारे


जामखेड शहर प्रतिनिधी  - सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानवाकडून आरोग्याकडे मोठे दुर्लक्ष होत आहे ही बाब चिंतेची आहे. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोकशाहीचा चौथा अधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधव सतत तणावाखाली असतात. या घटकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याबाबत सजग करणे महत्त्वाचे आहे. या घटकाने तणावमुक्त जीवन जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी प्रयोगवन परिवार व जामखेड तालुका डाॅक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त घेण्यात आलेला सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत अहमदनगर येथील एशियन नोबेल हाॅस्पिटलचे कार्डीओलॉजीस्ट डाॅ धनंजय वारे यांनी व्यक्त केले. 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 191 व्या जयंती निमित्त प्रयोगवन परिवार व जामखेड तालुका डाॅक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, जामखेड तालुक्यातील पत्रकार तसेच प्रयोगवन संचलित संडे स्कुलमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले होते 

यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार व मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड तालुका डाॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ अविनाश पवार होते. यावेळी डाॅ प्रताप गायकवाड, डाॅ प्रकाश खैरनार, डाॅ सचिन काकडे , हनुमंत काळे, निलेश शिंदे, डाॅ जतीन काजळे , डाॅ सिताराम ससाणे , डाॅ सुशिल पन्हाळकर, डाॅ पांडूरंग सानप, डाॅ अशोक बांगर, डाॅ प्रताप चौरे, डाॅ संजय राऊत , डाॅ राजेंद्र पवार, डाॅ अर्चना झगडे, जामखेड रोटरी क्लबचे अध्यक्ष विनायक राऊत सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार म्हणाले की , प्रयोगवन परिवार व जामखेड तालुका डाॅक्टर्स असोसिएशनने पोलीस दलातील कर्मचारी व कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या पाठीशी कोणीतरी आहे हा विश्वास दुणावला असुन यातुन पोलीस प्रशासनाला बळ मिळणार आहे. पोलीसांच्या तणावमुक्त जिवनासाठी सातत्याने असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख यांनी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याबाबतची सविस्तर भूमिका मांडत प्रयोगवनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जामखेड तालुका डाॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ अविनाश पवार, डाॅ सचिन काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान पोलीस बांधव , पत्रकार बांधव व संडे स्कुलच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डाॅ धनंजय वारे, डाॅ संजय राऊत , डाॅ सचिन काकडे , डाॅ अर्चना झगडे, डाॅ प्रताप चौरे, डाॅ सुशिल पन्हाळकर, डाॅ अशोक बांगर, डाॅ जतिन काजळे, डाॅ सिताराम ससाणे, या तज्ञ डाॅक्टरांनी 110 रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली. आरोग्य तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅक्टर्स असोसिएशनचे सचिव डाॅ संजय राऊत तर आभार डाॅ प्रताप गायकवाड यांनी मानले.