Breaking News

राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत अविष्कार गृप प्रथम


जामखेड शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धेत आळेफाटा येथील कला अविष्कार गृप ने प्रथम क्रमांक पटकाविला, तर द्वितीय क्रमांक विभागून व्हॉम्पायर गृप बीड व शिवरुद्र गृप जुन्नर तर तृतीय क्रमांक विभागून एम.जे. गृप लातूर व आर्ट शल्टर डान्स गृप टु जामखेड यांनी पटकाविला. यावेळी महाराष्ट्रातील 250 कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

ग्रामीण भागातील व महाराष्ट्रातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा या हेतूने जामखेड युथ फेस्टिव्हल सांस्कृतिक कला मंच व श्री समर्थ प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड महोत्सवाच्या माध्यमातून दि. 30 मार्च ते 1 एप्रिल अशी तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचे स्पर्धेचे 9 वे वर्ष आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात, उद्योजक रमेश आजबे, शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, शिवसेना युवा नेते लक्ष्मण कानडे, समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन साळवे, नगरसेवक अमित चिंतामणी, दिंगबर चव्हाण, पवन राळेभात, गुलाब जांभळे, भानुदास बोराटे, काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस मंगल भुजबळ, भास्कर मोरे, संजय बेलेकर, महेश राळेभात, सुंदर परदेशी, तुकाराम दळवी, दत्तत्रय राऊत, चेतन राळेभात, अमोल चिंतामणी, अमोल हजारे, अमोल गिरमे, हभप अमृत डूचे महाराज, पवन राळेभात, गणेश डोंगरे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, तहसीलदार विजय भंडारी, विनायक राऊत, नगरचे नाट्य परिषदेचे सदस्य सतिष लोटके आदी उपस्थित होते. 
नृत्य सादरीकरणातील लक्षवेधी दिलखेचक अदाकारी, धमाल नृत्याला मिळणारी तरुणाईसह महिलांची उत्स्फूर्त दाद आणि संगिताच्या तालावर बालगोपाल कलाकारांचे थिरकणारी पावलं,जामखेडकरांसाठी आनोखी पर्वणीच ठरली होती.

मोठ्या गटात प्रथम क्रमांक सुरज भोपे, (लातूर) द्वितीय रोहित काळे, (जुन्नर) तृतीय क्रमांक विभागून, अनुष्का अंधारे (जामखेड) व शिवानी वाघे (खर्डा) चतुर्थ क्रमांक विभागून अनामिक आहिरे (बीड) व आकाश शेगर (मालेगाव) यांनी मिळविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष श्रीधर सिध्देश्‍वर, अविनाश बोधले, ओंकार दळवी, लियाकत शेख, रजनीकांत साखरे, दिपक तुपेरे, जितेंद्र आढाव, सागर चौरे, कल्याण जगताप, आनंद गाडेकर, मोरेश्‍वर राजगुरू, प्रलेश बोरा, आमोल कदम, अमित पिपाडा, ज्ञानेश्‍वर कोळेकर, विजय जाधव, धनंजय पवार यांनी परीश्रम घेतले.