यात्रोत्सवांना उन्हाच्या तडाख्याचे ग्रहण
उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलेला दिसून येत आहे. त्यात ग्रामीण भागीतील यात्रा, जत्रांचे कार्यक्रम याच दिवसांमध्ये आहेत. त्यामुळे घराबाहेर असण्याचे प्रमाण यादिवसांत अधिक असते. त्याचाच परिणाम म्हणून उन्हामध्ये गेल्यानंतर चक्कर येणे, गरगरणे, भूक न लागणे असे प्रकार घडत असतात. त्यामुळे शक्यतो लहान मुलांना उन्हामध्ये फिरण्यास मनाई केली जाते.
आपल्या शरिरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होणे असे प्रकार सुरू असतात, ते टाळण्यासाठी दिवसातून अधिकाधिक पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उन्हामध्ये जात असताना सुती कापडाचा वापर करणे अशा पद्धतीने साधारण काळजी घेणे आवश्यक आहे.