Breaking News

वाघेश्‍वरी देवी यात्रोत्सवाची जंगी हंगाम्याने सांगता


शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील ग्रामदैवत वाघेश्‍वरी देवी यात्रोत्सवानिमित्त आयोजीत कुस्त्यांच्या जंगी हगाम्यात येथील गोकुल वस्ताद तालमीतील मल्ल अनिल लोणारे ( वाघोली ) यांनी प्रतिक दहिया ( दिल्ली ) यांना चितपट करून चांदीची गदा व एक लाख एकरा हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. ते पहिल्या वाघेश्‍वरी केसरी या किताबाचे मानकरी ठरले. वाघोली येथील वाघेश्‍वरी देवीच्या यात्रेनिमीत्त यंदा प्रथमच सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेशराव भालसिंग यांच्या पुढाकारातून रविवार ( दि. 1 ) रोजी सायंकाळी कुस्त्यांचा जंगी हंगामा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी नामवंत मल्लांच्या कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. 

या हंगाम्यात राज्यभरातील 60 मल्लांनी सहभाग घेतला. हंडीनिमगाव ( ता. नेवासे ) येथील त्रिवेणी देवस्थान संस्थानचे प्रमुख सुनिलगिरी महाराज यांनी प्रथम कुस्ती लावून हंगाम्यास प्रारंभ केला. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली वल्लाकटी -देवकर, महाराष्ट्र केसरी मल्ल गुलाबराव बर्डे, प्रशिक्षणार्थी आय.पी.एस अधिकारी निलाब रोहन, पुणे मनपाचे नगरसेवक आयुब शेख, जिल्हा परिषदचे माजी सदस्य नितीन काकडे, भाजपचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, सावली प्रतिष्ठाणचे अध्यक्ष उमेश भालसिंग, अमोल सागडे, संजय देशपांडे, साईनाथ आधाट, सुनिल रासने, तुषार पुरनाळे, सरपंच बाबासाहेब गाडगे, उपसरपंच पाराजी दातीर आदी प्रमुख उपस्थित होते.

व्दितीय 75 हजाराच्या कुस्तीसाठी अनिल ब्राम्हणे (ब्राह्मणी ) व बळीराम दौंड यांच्या लढतीत ब्राम्हणे यांनी बाजी मारली. तृतीय क्रमांकाची 51 हजाराची कुस्ती कैलास आठरे यांनी तर चतुर्थ क्रमांकाची 21 हजाराची कुस्ती सुनिल लोणारे यांनी जिंकली. या हंगाम्यामध्ये सुनिता नवधर, प्रियंका धनगर या महिला मल्लांच्या कुस्त्या चित्तथरारक झाल्या. पंच म्हणून एन.टी निकाळजे यांनी काम पाहिले. वाघोली येथील दिनकर फुंदे, भगवान शेंडगे, भाऊसाहेब महाराज भालसिंग, बापु चितळकर, ज्ञानेश्‍वर शेळके, रविंद्र शेळके, मोतीराम काळे, संजय गायकवाड, श्रीनिवास भालसिंग, रमेश दातीर, भगवान भालसिंग, भगवान शेंडगे, शरद पवार, बाजीराव अल्हाट यांनी हगाम्याच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संयोजक उमेश भालसिंग यांनी केले.