श्रीलंकेत पुणे स्मार्ट सिटीच्या विकासकामाचा गौरव
पुणे : परिसर आधारित विकासाअंतर्गत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने करण्यात आलेल्या रस्ता पुनर्रचनेला (स्ट्रीट रिडिझाईन) आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. श्रीलंकेत नुकताच पुणे स्मार्ट सिटीच्या या विकासकामाचा गौरव करण्यात आला. यामुळे पुणे स्मार्ट सिटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.जनतेसाठी परवडेल असे डिझाईन बनवल्याबद्दल इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाईनर्स (खखखऊ) कडून सर्वोत्कृष्ट डिझाईनचा पुरस्कार देण्यात आला. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाईनर्सचे अध्यक्ष प्रताप वसंत जाधव यांच्या हस्ते वास्तुरचनाकार प्रसन्न देसाई यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने यांनी हा पुरस्कार स्वीकारला.प्रसिद्ध वास्तुविशारद जॉफरी बावा कांडलामा यांनी डिझाईन केलेल्या ‘कांडलामा श्रीलंका’ या प्रसिद्ध वारसा स्थळाच्या ठिकाणी 25 मार्च रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे महापालिका, तसेच प्रकल्प व्यवस्थापन व अंमलबजावणी करणारी संस्था आयबीआय यांच्या वतीने प्रसन्न देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाईनर्सचे अध्यक्ष प्रताप वसंत जाधव यांच्या हस्ते पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप आणि वास्तु व नगररचनाकार प्रसन्न देसाई यांच्या उपस्थितीत पुण्यात या पुरस्काराचे पुन्हा वितरण करण्यात आले.तत्पूर्वी, अमेरिकेत शिकागो येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेत औंधमधील स्मार्ट स्ट्रीट प्रकल्पाचे सादरीकरण करण्याचा मान पुणे स्मार्ट सिटीला मिळाला आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ सिटी ट्रान्सपोर्टेशन ऑफिशिअल्स (छ-उढज) या संस्थेच्या वतीने ऑक्टोबर- नोव्हेंबर 2017 मध्ये ‘डिझाइनिंग सिटीज् 2017- शिकागो’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. न्याय्य, सुरक्षित आणि चैतन्यमय शहरांच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या देशांतील शहरांना एकमेकांकडून रस्ते पुनर्रचना, सार्वजनिक ठिकाणे अशा सुविधांबाबत नवीन गोष्टी शिकता याव्यात यावर या परिषदेचा भर होता.