Breaking News

दहेगांवकरांसाठी महाराष्ट्र बँक ठरतेय पांढरा हत्ती!


कोपरगाव, ग्रामीण तसेच शहरी भागात आर्थिक उलाढालीत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या बँकांमध्ये रोकड लवकर संपणे, ही ग्राहकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील बँक अॉफ महाराष्ट्रच्या दहेगाव शाखेत आज {दि. ३} खातेदारांना असाच मनस्ताप सहन लागला. सर्व काही खटाटोप करून रोकड उपलब्ध झाली आणि दुपारी तीनच्या आत ती संपलीदेखील. त्यामुळे ही बँक या परिसरातील ग्राहकांसाठी एक ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे. 
या बँकेची सकाळी ११ ते ६अशी कामकाजाची वेळ आहे. दरम्यान, दोन दिवस बँक बंद असल्याने सकाळी साडेदहा वाजताच बँक आवारात खातेदारांनी गर्दी केली होती. मात्र बँक उघडूनदेखील रोकड उपलब्ध नसल्याने तब्बल एक वाजेपर्यंत खातेदारांना ताटकळत उभे रहावे लागले. बँकेचे व्यवस्थापक रोकड आणण्यासाठी गेल्यामुळे तक्रारी ट्रिओ कोणाकडे कराव्यात, अशी समस्या या ग्राहकांसमोर उभी ठाकली. 

दरम्यान, एक वाजता रोकड उपलब्ध झाली. मात्र दोन तासात संपली आणि खातेदारांना पैशे देण्यास बँक व्यवस्थापनाने असमर्थतता दर्शविली. केवळ १५ लाख रुपयांची रोकड आणली गेल्याचे व्यवस्थापक आणि रोखपालाकडून सांगण्यात आले. हा नित्याचा प्रकार झाल्याने परिसरातील बहुतांशी शेतकरी, कष्टकरी खातेदार वैतागले आहेत. कर्जपुरवठा करण्यासदेखील व्यवस्थापक नकार देतात. मुद्रा लोणचे तर नावही काढून दिले जात नाही. त्यामुळे या परिसरात ही बँक ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.