Breaking News

भारिप बहूजन महासंघाच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर घंटानाद


जामखेड तालुक्यामध्ये भारिप बहुजन महासंघाच्या वतीने काल रोजी जामखेड तहसिल कार्यालयासमोर भिमा कोरेगाव हल्ल्यातील सुत्रधार म्हणून संबोधन्यात आलेल्या संभाजी भिडे यांना अटक व्हावी, यासह विविध प्रश्‍नांच्या संदर्भात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

जामखेड तालुक्यातील भारिप बहुजन महासंघाचे जामखेड तालुका अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड व महासंघाच्या तालुक्याची कमेटी या सर्वांच्या वतीने भिमा कोरेगाव हल्ल्याचे मुख्य सुत्रधार मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे गुरूजी यांना त्वरीत अटक करण्यात यावी. भिमा कोरेगाव हल्ला प्रकरणातील बहुजन बांधवावरील सर्व गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावी. ओबीसी, व्हि.जे, एन.टी, एस.बी.सी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी. एस.सी, एस.टी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा यासह आदी मागण्यांच्या संदर्भात जामखेड तहसिलसमोर सुमारे 3 तास घंटानाद आंदोलन करून शासनाला या संदर्भातील निवेदन देण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी भारिप बहुजन महासंघाचे जामखेड तालुकाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, लोक अधिकार आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अरूण जाधव, विकी सदाफुले, सागर आहेर, योगेश सदाफुले, भारतीय परिवर्तन सेनेचे जिल्हा अध्यक्ष पोपटराव फुले, बापु ओहोळ, गणेश घायतडक, सुखदेव घोडेस्वार, रवि कांबळे, सुरेखा सदाफुले, अमित जाधव, अरूणा सदाफुले, पुष्पा शिरोळे, शैला सदाफुले आदींसह तालुक्यातील बहुजन व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.