पत्रकारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आझाद मैदान येथे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित पत्रकार आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पत्रकारांना 24 तास काम करावे लागते, यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ताण तणाव वाढतो. पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे शिबीर फायदेशीर आहे, याचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सर्व पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभो, अशा शुभेच्छाही दिल्या.