Breaking News

प्रपाठक चव्हाण आणि रुग्णालयासंदर्भात गंभीर तक्रारी


औरंगाबादच्या अधिपत्याखाली चालविल्या जात असलेल्या ३० खाटांच्या येथील रुग्णालयात वेगवेगळ्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. रुग्णालयाचे प्रपाठक भारत चव्हाण हे नियमित रुग्णालयात हजर राहत नाहीत, अशीही जोरदार चर्चा येथे ऐकायला मिळत आहे. 
रुग्णालयातील अधिकारी व विविध विभागातील कर्मचा-यांच्या दैनंदिन कामाचा तक्ता ( ड्युटी चार्ट) रुग्णालयाच्या दर्शनी भागात वेळोवेळी मागणी करुनही अद्यापपावेतो लावण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली आहे. त्याचबरोबर दर शुक्रवारी औरंगाबाद येथून येणा-या डाॅक्टरांची सूचीदेखील येथे लावण्यात येत नाही. या रुग्णालयातील या सावळ्या गोंधळाकडे वरीष्ठ अधिका-यांचेही लक्ष्य नसल्याचे दिसून आले आहे. सोमवारी {दि. २ } रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी उपस्थित नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्यानंतर या बाबतीतील वस्तुस्थिती समोर येण्यासाठी अॅड. संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नायब तहसिलदार फोलाने यांच्याकडे गा-हाणे मांडण्यात आले. दैनंदिन उपस्थिती नोंद रजिस्टर तसेच हालचाल रजिस्टरदेखील उपलब्ध होऊ शकले नाही. वैद्यकीय अधिका-यांचेही दैनंदिन उपस्थितीचे हजेरी रजिस्टर ठेवणे आवश्यक असतांनाही येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिका-यांचे उपस्थिती हजेरी रजिस्टर ठेवण्यात आलेले नाही, ही धक्कादायक बाब पंचनामा करतांना समोर आली.