‘प्रिसिजन २०१८’ परिसंवादास ‘प्रवरा’मध्ये उत्साहात प्रारंभ
प्रवरानगर, कल्पनाशक्तीना भरघोस वाव देणारे राज्यभरातील पाचशे विद्यार्थीविद्यार्थनींचा सहभाग असलेल्या आणि पूर्णतः विद्यार्थ्यांनीच घडवून आणलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘प्रिसिजन २०१८’ या आगळ्या-वेगळ्या सामाजिक-तांत्रिक परिसंवादास प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आणि सध्या धुळे-नंदुरबार येथे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मुख्य कार्यकारी अभियंता असलेले संदीप पांडागळे याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक ज्ञानदेव म्हस्के, बन्सी तांबे, सहसचिव भारत घोगरे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. मनोज परजने, सिमा लव्हाटे, स्वाती राऊत, प्रा. एन. डी. साळी, समन्वयक प्रा. चंद्रकांत कडू, सह-समन्वयक प्रा. प्रताप विखे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी संकेत शिंदे, रोहित गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी प्रास्तविक केले. प्रा. व्ही. आर. राठी यांनी स्वागत केले.
यावेळी विविध महाविद्यालयांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पेपर-प्रेझेंटेशन, कॅड-वॉर, सी-कोडींग, लेथ-वॉर, प्रोजेक्ट एक्सजीबिशन (प्रदर्शन), टेक-वॉर, ब्रिज-मेकिंग, चेस,फेस-पेंटिंग, डिबेट,बॉक्स-क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, क्वीज-ऍप्टिट्यूड, पोस्टर-प्रेझेंटेशन, टॉवर-मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना संदीप पांडागळे म्हणाले, अशा प्रकारच्या सेमिनारचे आयोजन करणारे प्रवरा अभियांत्रिकी हे जगातील एकमेव महाविद्यालय आहे. यावेळी तांबे, घोगरे यांची भाषणे झाली.