श्री. साकेश्वर महाराज यात्रेची हगाम्याने सांगता
तालुक्यातील साकत येथील श्री. साकेश्वर महाराज यात्रेची हगाम्याने सांगता झोळी डावावर नान्नज ता. जामखेडचे सागर मोहळकर याने महारुद्र काळेला चितपट करून पटकावला. साकेश्वर केसरी किताब, मानाची चांदीची गदा व 51 हजार रूपये रोख असे बक्षिस देण्यात आले.
परिसरात साकतची यात्रा प्रसिद्ध आहे. चैत्र महिन्यातील पोर्णिमेनंतर येणार्या सोमवारी यात्रा असते. यात्रेसाठी सुमारे दीडशे कावड धारकांनी शनीचे राक्षसभुवन येथून अनवाणी पायांनी चालत पायी येवून सोमवारी सकाळी साकेश्वराला अभिषेक घालतात. सायंकाळी शेरणी वाटप कार्यक्रम असतो. तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असतात. मंगळवारी इनामी कुस्त्यांचा जंगी हगामा असतो. यात्रेसाठी गावातील बाहेर गावी असणारे सर्व लोक तसेच नातेवाईक व मित्र मंडळी येतात, यामुळे दोन दिवस गावात खूप गर्दी असते.
गावात विठ्ठल मंदिरात 63 वर्षांपासून अखंड वीनावादन व नंदादीप सुरू आहे. म्हणून शेवटची कुस्ती 51 हजार 63 रू., द्वितीय क्रमांक 31 हजार 63 रू, तृतीय क्रमांक 15 हजार 63 रू, चौथा क्रमांक 11 हजार 63 रूपये असे प्रत्येक कुस्तीवरती 63 रुपये जादा इनाम होता.
प्रथम क्रमांक नान्नजचे सागर मोहळकरने महारुद्र काळेलला झोळी डावावर चितपट करून पटकावला. साकेश्वर केसरी किताब व मानाची चांदीची गदा, द्वितीय क्रमांकाची कुस्ती बापू जरे व गुरू सिंह तृतीय क्रमांक आण्णा दाताळ व स्वप्नील भिसे तर चौथा क्रमांक सचिन दाताळ व राजू गायकवाड या कुस्त्या बरोबरीत सुटल्या गावातील विजय वराट, राहुल वराट व गणेश अडसूळ या मल्लांनी आपल्यापेक्षा सरस मल्लाला चितपट केल्याने अनेक बक्षिसे व वाहवा मिळवली.
उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद यांचा कुस्तीतील योगदानाबद्दल यात्रा उत्सव कमीटीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब आवारे, जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पगार, उल्हास माने, यात्रा कमीटीचे सदस्य पोलीस पाटील महादेव वराट, हरीभाऊ वराट, देविदास वराट, श्रीराम घोडेस्वार, सदाशिव हजारे, पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरुमकर, संजय वराट, हनुमंत पाटील, हनुमंत वराट, राजाभाऊ वराट, विष्णू वराट, उत्तम महाराज वराट, भागवत गवळी, वसंत वराट, बालाजी जरे यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी 2 वाजता सुरू झालेला हगामा रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होता, पोलीस निरीक्षक नितीन पगार व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. एक शिस्तप्रिय हगामा म्हणून परिसरात या हगाम्याने नावलौकिक मिळविला आहे. यावेळी ग्रामस्थसह तालुक्यातील आलेले पैलवान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.