डॉ. भास्कर शिरोळे यांना आरोग्य रत्न पुरस्कार प्रदान
पारनेर तालुक्यातील गणोरे येथील आम्ही गुणोरेकर फाऊंडेशनच्यावतीने पहिलाच पारनेर तालुका आरोग्य रत्न पुरस्कार अळकुटी येथील डॉ. भास्कर शिरोळे यांना प्रसिध्द हास्यकवी देवा झिंजाड व बबन या मराठी चित्रपटातील नायक भाऊसाहेब शिदे यांच्या शुभहस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना देवा झिंजाड म्हणाले, माझे मुळ गांव गारखिंडी आहे. शालेय जीवनापासून डॉ. शिरोळे यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान पाहत आलो आहे. गेली 25 वर्षे त्यांनी नित्यसेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची अतिशय अल्पदरांत प्रसंगी गरीब रुग्णांची मोफत अहोरात्र आरोग्य सेवा केली आहे. प्रत्येकाच्या सुख दु:खात सहभागी होऊन आधार देण्याचे काम केले. अशा चांगल्या माणसाचा गौरव माझ्या हस्ते झाला हे माझे भाग्यच आहे.
कार्यक्रमाला आय.पी.एस. डॉ. गणेश पोटे, सरपंच प्रमोद खोसे, माजी सरपंच जयसिंग बढे, माजी चेअरमन कचर कारखिले, उपसरपंच सुभाष गाडीलकर, मार्केट कमिटी संचालक आण्णासाहेब बढे, सेवानिवृत्त ग्रामसेवक बाजीराव गोपाळे, चेअरमन कचर बोचरे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब बढे, माजी चेअरमन मोहन बढे, माजी उपसरपंच मच्छिंद्र मेसे, ग्रा.पं. सदस्य एकनाथ मेसे, दत्ता गोपाळे, अरुण बढे, संतोष गाडीलकर, अभिनव पतसंस्थेचे चेअरमन कैलास लोेंढे, नेत्ररोगतज्ञ डॉ. स्वप्नील भालेकर, राजू म्हस्के, आदर्श शिक्षक तुकाराम एरंडे, आम्ही गुणोरेकर फाऊंडेशनचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाराम कवडे, प्रास्ताविक सचिन भालेकर व आभार प्रदर्शन महेंद्र बढे यांनी केले.