गुंड-वारे वस्ती शाळेत 4 थीच्या विद्यार्थ्यांना निरोप
कर्जत तालुक्यातील कुळधरण - कोपर्डी मार्गालगतच्या गुंड-वारे वस्ती शाळेत 4 थीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ तसेच पहिल्या इयत्तेत प्रवेशीत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापू गुंड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
मुख्याध्यापक नितीन घालमे यांनी प्रास्ताविकातुन शाळेमध्ये राबविल्या जाणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांना आवाहन केले. साहेबराव सुपेकर, हभप जगन्नाथ महाराज वाळेकर, तात्या गुंड, रमेश वारे, चांगदेव सुपेकर, अशोक घालमे, संतोष अनभुले, महेंद्र वारे, जालिंदर आजबे, दादा सुपेकर, स्मिता गडगडे, लालासाहेब वारे, शुभांगी जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. साहेबराव सुपेकर, अशोक घालमे, लालासाहेब वारे, गजरमल यांची भाषणे झाली. शाळा अधिक समृद्ध बनविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांमध्ये शुभांगी क्षीरसागर, मोनाली गुंड, प्रज्ञा गजरमल, कोमल सुपेकर, शिवराज औटे, समर्थ गुंड यांनी शाळेप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला. शिक्षिका स्मिता गडगडे यांनी आभार मानले.