Breaking News

मुंडेंचे घुमजाव अन् केसरकरांकडून अपेक्षा


महाराष्ट्र विधान परिषदेचे तरूण तडफदार विरोधी पक्षनेते ना. धनंजयजी मुंडे यांच्याकडून महाराष्ट्रातील अन्यायाला गाडण्याची अपेक्षा आहे, तथापी नामदारांच्या कथनी आणि करणीत फरक आहे हा अनुभव महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतला. इगतपुरीच्या या प्रकरणासंदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने मुंबईत त्यांची भेट घेऊन झाला प्रकार कानावर घातला. प्रकार समजुन घेतल्यानंतर पोलीस अधिक्षकांशी बोलतो, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीतो, सभागृहात मुद्दा उपस्थित करतो, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. तथापी दोन दिवसात परिस्थिती पालटली. या प्रकरणात अडचणीत येऊ पाहणार्‍या मंडळींनी इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या राजकारणात आधी मुंडेंच्या पक्षाच्या घड्याळाला चावी देता देता हळूच लाल बावटा फडकावणार्‍या पुढार्‍याच्या माध्यमातून नामदारांचे मत आणि मन परिवर्तन करून पत्रकारांना मदत न करण्याचे आश्‍वासन घेतल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. दुसर्‍या बाजुला गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले असुन त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.