हप्तेखोरीची तक्रार केली म्हणून पत्रकाराला अडकवले खोट्या गुन्ह्यात
नाशिक/ प्रतिनिधी - पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील सख्य चव्हाट्यावर आणुन आर्थिक हितसंबंधांना बाधा आणाल तर तुमच्या विरूध्द हमखास खोटे गुन्हे दाखल करू, तुमच्याच सहकार्यांना खोट्या गुन्ह्याची अतिरंजीत माहीती पुरवून छापून आणू, आणि तुमच्या अब्रुचा समाजात पंचनामा करू असा पत्रकारांना इशारा देऊन तो प्रत्यक्षात अंमलातही आणला, इगतपुरीचे पोलीस निरिक्षक राजेश शिंगटे आणि स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरिक्षक अशोक करपे यांनी. पत्रकारांना जिथे पोलीसांच्या सुड कारवाईच्या सुळावर बळी चढविले जाते तिथे सामान्य माणसाला ग्रामीण पोलीसांकडून न्याय मिळेलच याविषयी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. राजेश शिंगटे हे सिन्नर पोलीस ठाण्यात असतानाही तीन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी वादात सापडले होते. त्यावरून त्यांची ग्रामिण कंट्रोलला बदलीही झाली होती.
19 मार्च 2018 रोजी वृत्त वाहिन्या आणि आनलाईन न्युज पोर्टलवर तर 20 मार्च 2018 रोजी जिल्ह्यातील जवळपास सर्वच वृत्तपत्रांमध्ये एक वृत्त ठळकपणे झळकत होते. वृत्ताचा मथळा होता - इगतपुरीत रेव पार्टीवर इगतपुरी आणि स्थानिक गुन्हेच्या पोलीस पथकाचा संयुक्त छापा. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर अश्लिल वर्तन करणार्या बारबालांसह कथित पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाला अटक, कथित पत्रकारासह पंधरा आरोंपींना अटक. वगैरे...वगैरे...
या बातम्यांच्या प्रवाहाची तिव्रता पाहिल्यानंतर इगतपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धुरा सांभाळणार्या शुर म्होरक्यांनी प्रचंड ताकदीचे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले असावे, किंबहुना या ठिकाणी एखादी आंतरराज्यीय टोळी मानवी देह व्यापार किंवा तस्करी करीत असतांना रंगेहाथ पकडली गेली असावी. अशी शंका आली. बातमीदारांनी आणि बातमीदारांवर पोसले जाणार्या विद्वानांनी या बातमीला दिलेला न्याय किती अनैसर्गिक होता याची जाणीव एकूण घटनेची शहनिशा केल्यानंतर लक्षात आले. आणि काही निवडक पत्रकारिता कायद्याचा मनमानी वापर करणार्या प्रवृत्तीसोबत कशी वाहत जात आहे, याचेही विदारक चित्र समोर उभे राहीले.
प्राप्त माहीतीप्रमाणे दि. 18 मार्च 2018 रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ या नोंदणीकृत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि सायं. दै. काळीमातीचे संपादक डॉ. राहुल जैन - बागमार हे त्यांचे मित्र आणि मैत्रिणींसोबत इगतपुरीच्या त्या विवादीत बंगल्यावर खाजगी पार्टीसाठी गेले होते. बंगल्याचे केअर टेकर यांच्या पूर्व परवानगीने संपन्न होत असलेल्या त्या पार्टीसाठी आवश्यक असलेला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य प्राशन परवानाही प्रत्येकाने मिळवला होता. साधारण पाच वाजता ही मित्र मंडळी बंगल्यावर पोहचली. त्यानंतर साधारण आठ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप हांडगे यांनी बंगल्याच्या केअरटेकरला फोनवरून या ठिकाणी आज स्थानिक गुन्हे शाखेचा छापा पडणार आहे, अशी माहीती दिली.
ही माहीती मिळाल्यानंतर केअर टेकरने डॉ. राहुल जैन यांना पोलीसांचा निरोप पोहोचविला आणि पार्टी रद्द करून परत जा असा सल्लाही दिला. तथापी या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करीत नाही, करणार नाही, मग आम्ही का जायचे? पोलीस आल्यावर आम्ही सर्व सज्ञान मित्र-मैत्रिणी या ठिकाणी सहमतीने खासगी पार्टी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.कायद्याचे बंधन पाळून पार्टी सुरू राहणार आहे, हे पोलीसांच्या निदर्शनास आणून देऊ, अशी भुमिका घेत पार्टी सुरू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. त्या नंतर स्वतः जैन-बागमार यांनी पोलीस कर्मचारी संदीप हांडगे यांनाही फोनवरून तशी कल्पना देण्याचा प्रयत्न केला असता हांडगे यांनी बाजू समजून न घेता खाकी ठेवणीतील अश्लाघ्य भाषेत जन्मदात्यांचा उध्दार केला. दरम्यानच्या काळात केअर टेकरने डॉ. जैन यांच्यासोबत आलेल्या मैत्रिणींना रुममधून धक्के मारत बाहेर काढण्यास सुरूवात केली होती. ही बाब डॉ. राहुल जैन-बागमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक करपे यांना भ्रमणध्वनीवर निदर्शनास आणून दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे आपले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक छापा मारणार आहे ही गोपनीय माहीती जिथे छापा पडणार आहे, त्या संबंधितांना आधी कळवतात, यावरून पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सावज ठरू शकणार्या मंडळींमध्ये आर्थिक हितसंबंध निर्माण झाले असावेत अशी शंका व्यक्त करणारी तक्रार डॉ. जैन - बागमार यांनी अशोक करपे यांच्याकडे केली होती. यादरम्यान झालेल्या संभाषणाची ध्वनीफितही उपलब्ध आहे. त्यानंतर साधारण 11 वाजता इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, संदीप हांडगे, गणेश वराडे आणि अन्य पाच सहा पोलीस कर्मचार्यांनी बंगला नंबर 9 चा ताबा घेतला. आणि पोलीस निरिक्षक राजेश शिंगटे यांनी डॉ. राहुल जैन आणि त्यांच्या सहकार्यांना सराईत खुँखार गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.त्याचवेळी संदीप हांडगे यांनी फोन वर विद्वत्ता पाजळत होता ना उद्या पासून समाजात तोंड दाखवण्याच्या लायकीचा ठेवणार नाही, अशी धमकी देत होते. त्यानंतर रात्री एक वाजेच्या सुमारास इगतपुरी पोलीस ठाण्यात आणले आणि मैत्रिणींसह पुरूष मित्रांवर रेव पार्टी करीत असल्याचा गुन्हा नोंदविला.
डॉ. राहुल जैन - बागमार आणि त्यांचे मित्र मैत्रिणी बंगल्यात खासगी स्वरूपाची पार्टी करीत असतांना ही घटना रस्त्यावर आणून घटनेला सार्वजनिक स्वरूपाचे हिडीस रूप देण्याची पोलीसी शक्कल लढवून तरूणींना बारबाला ठरविण्याचा प्रमादही केला. कायदेशीर सोपस्कार पुर्ण करून दुसर्या दिवशी सकाळी म्हणजे दि. 19 मार्च रोजी संदीप हांडगे यांनी राहुल जैन यांना आदल्या रात्री दिलेली समाजात तोंड दाखविण्याच्या लायकीचा ठेवणार नाही, ही धमकी सत्यात आणण्याचे कृष्णकृत्य पार पाडले. आपल्या गोटातील पाळलेले काही पत्रकार हाताशी धरून अतिरंजीत माहीती पुरवून कल्पित घटनाक्रम निर्माण करून त्यांच्यासमोर ठेवला आणि पुरूषांसह तरूणींचेही नावे बारबाला म्हणून प्रसिध्द करण्याची गळ घातली.इतकेच नाही तर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयातून दाखल गुन्ह्यांसदर्भात प्रसिध्दीसाठी दिल्या जाणार्या दैनंदिन गुन्हे अहवालातही (डिसीआर) मुलींची नावे समाविष्ट करून दिली.
त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनीही पोलीसांचा शब्द प्रमाण मानून एका सर्वसाधारण घटनेला दिलेली भली मोठी प्रसिध्दी एका वेगळ्या षडयंत्राची शंका उपस्थित करते. मिळालेल्या माहीतीनुसार या पूर्वी या ठिकाणी तीनवेळा पोलीसांनी छापा टाकला आहे. एका छाप्यात तर महाराष्ट्रातील आयएएस, आयपीएस, सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणार्या उच्चपदस्थांचे दिवटे प्रतिबंधीत नशिले पदार्थांसह सापडल्याची वाच्यता आहे. त्यावेळीही या छाप्यात सापडलेल्या संशयितांची नावे झळकली नाहीत. तिथे पोलीसांनी आवश्यक ती खबरदारी घेत नावांबाबत कमालीची गुप्तता पाळली. मग यावेळी खासगी पार्टीवर जाणीवपुर्वक मारलेल्या छाप्याचे ढोल बडविण्यात एवढे स्वारस्य का दाखवले गेले? या प्रश्नाचे उत्तर पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील संगनमत उघड करणारा आवाज दाबण्याचा हेतु हाच आहे.
गंमत म्हणजे काही विद्वान पत्रकारांनी या घटनेला जीवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना धादांत खोटे वृत्त प्रसिध्द करून संबंधीत माध्यमाची विश्वासार्हताही पोलीसांच्या दावणीला बांधली. एकाने डा.राहुल जैन यांच्या राहत्या घराची झडती पोलीसांनी घेतल्याचे वृत्त प्रसिध्द केले, हे वृत्त वाचल्यानंतर संबंधित पत्रकाराच्या बुध्दीची किव येते. जामीन मिळाल्यानंतर संशयीताच्या घराची झडती घेता येत नाही, घ्यायची असेल तर सन्माननीय न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. संशयीतांकडून गुन्ह्याच्या तपास कामी काही मुद्देमाल हस्तगत करायचा असेल, काही कागदपत्र आवश्यक असतील तर घर झडतीचे प्रयोजन असते. या गुन्ह्यात असे काही नव्हते मग घर झडतीची टेबल न्यूज छापून संबंधीत पत्रकाराला नक्की काय साधायचे होते? आणखी दुसर्या एका विद्वानाने डॉ. जैन यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात वाद घातल्याचे वृत्त प्रसिध्द करून माहीतीचे स्रोत किती खोलपर्यंत आहेत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अशा छाप्यांमध्ये पकडलेल्या संशयितांनी ग्रहण केलेल्या मद्याची रक्तातील टक्केवारी तपासण्यासाठी फोरेन्सिकला नमुने पाठवले जातात. हा रक्ताचा नमुना जपून ठेवण्यात यावा, याविषयी विनंती पत्र देण्यासाठी डॉ. जैन - बागमार जिल्हा शासकीय रूग्णालयात जिल्हा चिकीत्सकांना भेटले. त्यांच्या सुचनेनुसार विनंती पञ आवकवहीत नोंद करून परतले. यात वादाचा प्रश्न आला कुठे? या संदर्भात जिल्हा शल्य चिकीत्सकांनीही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हा छापा आणि छापून आणल्या गेलेल्या बातम्या कटाचा भाग होता याचा आणखी एक पुरावा म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कामगार कायद्याप्रमाणे नोंदणी असलेला महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ आणि आरएनआय ने नोंदणी दिलेल्या सायं दैनिकाचा मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक असलेले डॉ.राहुल जैन यांना कथित ठरविण्याचा उपदव्याप केला गेला. हास्यास्पद बाब म्हणजे जे स्वतःच बेकायदेशीर वृत्तवाहीनी चालवितात, प्रत्येक बातमीचे मुल्य हजार-पाचशे वसुल केल्याशिवाय वृत्त प्रसारीत करीत नाहीत, ज्यांनी कधी शासकीय कर भरला नाही, जीएसटी न भरता बातम्या आणि जाहीरातींचा धंदा करून शासनाची रोज फसवणुक करतात त्या निवडक स्थानिक बाजारू वृत्तवाहिन्यांनीही पोलीसांच्या या मर्दुमकीची टीमकी वाजवण्याची हौस भागवून घेतली.
या सर्व घटनाक्रमांवरून हा सारा बनाव होता, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज भासू नये.
गुन्हेगार पोलीस येण्याची वाट बघतो का?
बेकायदेशीर काम करणारा कुठलाही गुन्हेगार पोलीसांची नजर चुकवित गुप्तपणे आपल्या कारवाया करीत असतो. या कृष्णकृत्याची खबर पोलीसांना लागली आणि पोलीसांचा छापा पडणार आहे, याची भनक लागताच गुन्हेगार पळ काढतात. इगतपुरीच्या या प्रकरणात ज्यांना गुन्हेगार ठरविण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला गेला ते डॉ. राहुल जैन -बागमार यांना स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणी छापा टाकणार आहे याची माहीती बंगल्याच्या केअर टेकरने संदिप हांडगेचा हवाल्याने दिली होती. तथापी डॉ. जैन आणि त्यांची मित्र मंडळी कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर काम करीत नसल्याने पोलीस विनाकारण त्रास देणार नाहीत हा विश्वास त्यांना होता. रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत ते स्वतः भ्रमण ध्वनीवरून एलसीबीचे पोलीस निरिक्षक अशोक करपे, पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्याशी बोलत होते. बेकायदेशीर कृत्य करीत असते तर चार तास आधी छाप्याची माहीती मिळाली असतांना घटनास्थळावर थांबण्याचे धाडस गुन्हेगार दाखविल का? यावरून पोलीसांची हप्तेखोरी उघड होऊ नये, यासाठी खोटी कारवाई करून तक्रारदाराचा आवाज बंद करण्यासाठी पोलीसांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा नतद्रृष्टपणा केला, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.
पोलीस अधिक्षकांची कथित कर्तव्यदक्षता
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेला वळण लावण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून संजय दराडे कर्तव्य दक्ष मानले जातात. पोलीस अधिक्षकांनी जिल्हाभर सुरू असलेले अवैध धंदे, लाँजिंग, दारू गुत्ते उध्वस्त केल्याची वाच्छता आहे. पोलीस कारवाईत उध्वस्त झालेले अवैध धंदे आणि प्रत्यक्षात सुरू असलेले अवैध धंदे यांचे गुणोत्तर अजून व्यस्त आहे. ग्रामीण पोलीसांची नजर लाँजींगवर प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे या कारवाईतून दिसते, त्यामागचे कारण काय यावर अधिक भाष्य करण्याची गरज नसली तरी नक्की करू. तात्पर्य हे की पोलीस अधिक्षक कर्तव्यदक्ष असतीलही पण आपली कर्तव्य दक्षता निरपराध व्यक्तीवर कारवाई करून मुलभुत अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्याला चुरगळणार नाही याची तेवढीच दक्षता पोलीस अधिक्षकांनी घ्यायला हवी.
हप्तेखोरी उघड होईल म्हणून कारवाई
इगतपुरीच्या त्या विवादीत बंगल्यावर छापा पडण्यापूर्वी रात्री साडे आठच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना डॉ. राहुल जैन - बागमार यांनी भ्रमणध्वनीवर संदीप हांडगे या एलसीबी पोलीस कर्मचार्यांची तक्रार केली होती. सकाळी लेखी तक्रार देतो, असेही म्हटले होते.छाप्याची माहीती दोन-चार तास आधी गुन्हेगारांना दिली जाते, अशा स्वरूपाची तक्रार लेखी स्वरूपात आली तर या सर्वांचीच अडचण होणार होती, म्हणून खोटी कारवाई करण्याचा कार्यभार रात्रीच उरकला गेला, विशेष म्हणजे पो. नि. करपे यांच्याकडे ज्या नावाची तक्रार झाली ते संदीप हांडगेही या छापा कारवाईत अग्रभागी होते.