जीवन प्रकाशमान होण्यासाठी ‘कापसे’चा उपयोग
मूकबधिर मुलामुलींच्या भविष्यासाठी झटणाऱ्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अंध आणि मूकबधिर युनिटमधील मुलांच्या प्लेसमेंटसाठी येवला येथील कापसे पैठणी उद्योग समुहाने रोजगाराच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. या या मुला-मुलींचे जीवन प्रकाशमान होण्यासाठी उपयोगी होईल, असा विश्वास व्यक्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी व्यक्त केला.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि येवला येथील कापसे पैठणी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने या अंध, अपंग, कर्ण आणि मूकबधिर युनिटमधील मुला-मुलींसाठी आयोजित केलेल्या रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेच्याउदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक ज्ञानदेव म्हस्के होते. याप्रसंगी कापसे पैठणी उद्योग समूहाचे संस्थापक बाळकृष्ण कापसे, पंचायत समितीचे उपसभापती बाबासाहेब म्हस्के, विखे पाटील कारखान्याचे संचालक अण्णासाहेब बेंद्रे, प्रवरा बँकेचे संचालक आबासाहेब मोकाशी, सुंदरबापू तुपे, उपसरपंच मिननाथ म्हस्के आदी उपस्थित होते.
प्रवरा कन्याविद्या मंदिरच्यावतीने विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. प्राचार्य प्रल्हाद शेळके, पर्यवेक्षक विजय चौधरी, अंध युनिटचे सुधाकर वाणी, कर्णबधिर युनिटच्या सगुणा सोनवणे, आलंम सय्यद, प्राथमिक विभागाच्या सीमा बढे, उच्च माध्यमिक विभागाचे प्रा. हरिभाऊ दिघे, तान्हाजी बेंद्रे, महेंद्र राठी, राजेंद्र गदिया आदींसह पालक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.