चंद्राबाबू नायडू यांनी घेतली पवारांची भेट
नवी दिल्ली : आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून भाजप व टीडीपीतील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. याच कारणावरून टीडीपीने भाजपबरोबरची युती तोडली. एवढेच नाही, तर त्यांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचाही प्रयत्न केला. मंगळवारी, टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काही महत्वाच्या व्यक्तींची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.
टीडीपी अध्यक्ष तथा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री नायडू यांनी आज संसदेत आपल्या खासदारांची भेट घेतली. याचदरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, फारुक अब्दुल्ला आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेटले. या भेटीमुळे पुन्हा विरोधक सरकार विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आण्याची योजनातर आखत नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे. तत्पूर्वी, टीडीपीने 16 मार्च रोजी आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच टीडीपी व वायएसआर काँग्रेस पक्षाने लोकसभा महासचिवांना पत्र लिहून संसदेत सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणीही केली होती.