Breaking News

सीमेवरील गोळीबारात महाराष्ट्रातील जवान शहीद

श्रीनगर : पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रंधीच्या उल्लंघनामुळे जखमी झालेल्या भारतीय सैन्याच्या जवानाने आपले प्राण गमावले. शुभम सूर्यकांत मुस्तापुरे असे या 20 वर्षीय जवानाचे नाव असून ते परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी या गावातील रहिवासी होते. याशिवाय जखमी झालेल्या तिघांपैकी आणखी एका जवानाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तान सैन्याने आज सकाळी सीमारेषेवर बेछूट गोळीबार केला होता. गोळीबार सकाळी 7 वाजता सुरू झाला. भारतीय सैन्याने या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले.


शहीद मुस्तापुरे यांच्या निधनाच्या बातमीनंतर गावावर शोककळा पसरली आहे. शहीद मुस्तापुरे यांचे पार्थिव बुधवारी दुपारी 12 वाजता कोनरेवाडीत दाखल होणार असल्याची मा हिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी दिली. मुस्तापुरे यांच्या निधनामुळे त्यांच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.