Breaking News

एमएमआरडीच्या दोनशे कोटी निधीची हेळसांड पाच टक्यांच्या दराने दत्तु गितेंची दहा कोटींची कमाई

भिवंडी/प्रतिनिधी : ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या भिवंडी उपविभागातील एमएमआरडीएच्या दोनशे कोटी निधीचा अपव्यय झाल्याची चर्चा शाखा अभियंता दत्तु गिते यांच्या कार्यशैलीवर संशय व्यक्त करण्यास कारणीभूत ठरली असून पंचायत समिती कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष झालेले आणि कागदावर दाखवलेल्या कामांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी समोर आली आहे. दरम्यान दत्तु गिते यांनी या आर्थिक वर्षात पाच टक्के दराने दहा कोटी रूपयांची कमाई केल्याचा संशय जिल्हा परिषद वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
ठाणे जिल्ह्याचा पारदर्शक विकास व्हावा म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत होणारी विविध विकास कामांचा एमएमआरए मध्ये समावेश करण्यात आला. तथापी एमएमआर अंतर्गत विकास कामांची अंमलाबजावणी, देखभाल, निरिक्षण आदी कामे करण्यासाठी आवश्यक तो कुशल तंत्रज्ञांचा जिल्हा परिषद असलेला अभाव, कुशल अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सेवेत येऊ द्यायचे नाही किंबहूना टिकू द्यायचे नाही, त्यासाठी हवी ती किंमत मोजून, चुगलखोरी करीत बदनामी करणारे शाखा अभियंता दत्तु गिते यांच्या मुळे या योजनेचा खेळखंडोबा झाला आहे. या योजनेअंतर्गत शासन पातळीवरून आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च झाला नाही. अनेक ठिकाणी कागदावर काम झाल्याचे दाखवून विकास योजनांना ठेंगा दाखविण्याचे कारस्थान दत्तु गिते यांनी केले. या वर्षी फक्त भिवंडी पंचायत समितीसाठी दोनशे कोटीचा निधी आला होता. आपल्या भ्रष्ट मार्गातील अडथळे दुर करून शाखा अभियंता आणि उपअभियंता असा दोन्ही पदभार स्वतःकडे ठेवण्याचे षडयंत्र राबवलेले दत्तु गिते यांनी शाखा अभियंता दोन टक्के आणि उपअभियंता तीन टक्के असा भाव फोडून एकट्याने पाच टक्क्याप्रमाणे तब्बल दहा कोटी रूपये कमावल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरू झाल्यानंतर भिवंडी उपविभागात दत्तु गिते यांच्या अखत्यारीत झालेल्या आणि केवळ कागदावर दाखवलेल्या सर्व कामांची चौकशी झाल्यास लोकमंथन गेल्या तीन दिवसापासून दत्तु गिते यांच्या कार्यशैलीसंदर्भात व्यक्त करीत असलेल्या संशय कटू सत्य असल्याचे स्पष्ट होईल.