तालुका राष्ट्रवादीच्यावतीने तहसिलदारांना निवेदन विरोधकांची स्टंटबाजी असल्याचा आरोप.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, केडगावची झालेली घटना व पोलीस अधिक्षक कार्यालयाची झालेली तोडफोड हे प्रकरण दुर्दैवी आहे. केडगाव घटनेतील आरोपी संदिप गुंजाळ याने स्वतः गुन्हा कबूल केला आहे की, वैयक्तीक जागेचा वाद व आर्थिक कारणास्तव हा खून केलेला आहे. या प्रकरणात कोणत्याही राजकारणी व अन्य कोणत्याही नेत्यांचा संबंध नाही. असे असताना या प्रकरणात आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप यांचे नाव गोवण्यात आलेले आहे. तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणात पक्षाच्या काही निर्दोष व्यक्तींची नावे या गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलली आहेत. या घटनेची पोलिसांनी पूर्ण चौकशी व शहानिशा करुन गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. तसेच पक्षाच्या निर्दोष व्यक्तींवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.
केडगावात झालेल्या घटनेचे आम्ही कोणीही समर्थन करणार नाही, मात्र त्या घटनेचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांशी लावून राजकीय दबावापोटी जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते त्वरीत मागे घेण्यात यावेत. या दाखल केलेल्या खोट्या गुन्हयामध्ये काही कारण नसतांना पक्षाच्या आमदारांची व पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी तालुकाध्यक्ष कैलास बोडे, महिला शहराध्यक्षा अर्चना पानसरे, शहराध्यक्ष लकी सेठी, युवक काँगे्रसचे तालुकाध्यक्ष गणेश ठाणगे, शहराध्यक्ष योगेश जाधव यांच्यासह जयंत चौधरी, रईस जहागिरदार, उत्तम पवार, उल्हास जगताप, विलास गोराणे, सुनिल थोरात, सचिन पटारे, भाऊसाहेब चोरमल, सैफ शेख, शैफ पटेल, सुरेश पाचपिंड, सुभाष आदिक, भाऊसाहेब चोरमल, विजय खाजेकर, किशोर बनसोडे, रमेश आरगडे, शहाराम शेटे, वसंतराव पवार, रामभाऊ औताडे, भागचंद औताडे, अशोक मुळे, विलास ठोंबरे, सोहेल शेख, नामदेव राऊत, लक्ष्मण धोत्रे, सुधाकर अडांगळे, निखिल सानप, सरवरअली सय्यद, रमजान पटेल, उत्तमराव आसने, अनिरुध्द भिंगारवाला उपस्थित होते.