Breaking News

श्रीरामपुरात भाजपच्या उपोषणाला राष्ट्रवादीच्या आत्मक्लेशाने उत्तर


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी /- श्रीरामपूर नागरपालिकेसमोर दोन दिवसापूर्वीच भाजपाने दिन दलितांना, मागासवर्गीयांना सुविधा मिळत नसल्याने नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध करत केलेल्या उपोषणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी शहरातील अवैध धंदे मटका दारू सुरु असून त्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन करून भाजपाच्या उपोषणाला उत्तर दिले आहे. त्यामुळे अवैध धंदे मटका व्यवसाय नेमकं कोण चालवत आहे.? पोलीस यंत्रांना त्यावर कारवाई का करत नाही. ? पोलिसांना अवैध धंदे दिसत नाही का ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. प्रभू श्रीरामांच्या पवित्र पावन भूमीत व श्रीरामपूरच्या पंचक्रोशीत गत अनेक दिवसांपासून अवैध मटका व्यवसाय तसेच अवैधरित्या दारू तयार करणार्‍या जीवघेण्या दारू भट्ट्या सुरु आहेत. हे बेक ायदेशीर अनैतिक उद्योग व्यवसाय करून अरेरावीने फिरणारा एक वर्ग तयार झाला आहे. अवैध व्यवसाय करणार्‍या व त्यांना खतपाणी घालणार्‍या विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांवर कडक क ारवाई करून त्यांना शासन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यकडे आत्मक्लेश आंदोलन करत केली आहे.