Breaking News

मुलगी वाचवा, देश वाचवा दिंडीचे प्रस्थान

नेवासे तालुका हा प्रभूरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत देवगड स्वछ, शांत, प्रसन्न, पवित्र अशा देवालयाचे महंत हभप. भास्करगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व मंहत सुनिलगिरी महाराज यांच्या प्रेरणेने मुलगी वाचवा देश वाचवा या अभियानांतर्गत श्री क्षेत्र शिरोमणी सावता महाराज चंदन उटी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र देवगड ते श्री क्षेत्र पंढरपूर अरण भव्य दिंडी सोहळ्याचे प्रस्थान काल सकाळी आठ वाजता श्री क्षेत्र देवगड येथून प्रस्थान करण्यात आले. यावेळी देवगड देवस्थानचे हभप. मंहत भास्करगिरी महाराज, माजी आ. पांडुरंग अभंग, जि. प. सदस्य दत्तात्रय काळे, अर्जुन सुसे, पं.स. सदस्य अजित मुरकुटे, अशोक मिसाळ, देवेंद्र काळे, रावसाहेब जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीला झेंडा दाखवण्यात आला. दिंडीचा प्रवास दोन दिवस चालणार आहे. देवगड, देवगड फाटा, नेवासा फाटा, सुरेश नगर, वडाळा , घोडेगाव, अहमदनगर पंढरपूर या मार्गाने दिंडी अरणला पोहचणार आहे. दिंडी प्रस्थान वेळी पं.स. सदस्य किशोर जोजार, रवींद्र जावळे, कैलास धाडगे, बाळासाहेब पेहरे, पोपट चौघुले, भुषण विधाटे, कारभारी चौगुले, शिवाजी फुलारी, बाळासाहेब वाघडकर, बन्सी सातपुते आदी उपस्थित होते.