Breaking News

प्रा. विजय पवार यांनी घेतली आंचल काबराची मुलाखत


कुळधरणचे सुपूत्र तसेच बीडच्या विजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष, प्रा. विजय पवार यांनी 2017 मध्ये झालेल्या नीटच्या परिक्षेत मराठवाड्यात प्रथम व भौतिकशास्त्र विषयात 180 पैकी 180 गुण मिळवून देशात प्रथम आलेल्या आंचल काबरा हीची मुलाखत घेतली. बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.

प्रोफेशनल सायन्स अकॅडमीच्या वतीने दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. चेअरमन प्रा. विजय पवार यांनी दिलखुलास पध्दतीने मुलाखत घेत आंचल हिच्या यशाचे गमक विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविले. या मुलाखतीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या विशेष प्रकट मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांसह पालकही उपस्थित होते. या मुलाखतीने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्यासाठी प्रेरणा व चेतना निर्माण झाली. अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी व पालकांनी भरलेल्या नाट्यगृहात झालेल्या मुलाखतीने विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा प्राप्त झाली. या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले.

कुळधरणला सायन्स कॉलेज आणि नीटची तयारी

प्रा. विजय पवार यांनी बीड येथे शैक्षणिक प्रकल्प उभारून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन दिल्याने मराठवाड्यात त्यांना लौकिक प्राप्त झाला. आपल्या जन्मभूमीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्व सुविधायुक्त शिक्षण घेता यावे यासाठी सायन्स ज्युनियर कॉलेज तसेच नीटच्या तयारीसाठी प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे. छत्रपती पब्लिक स्कूलच्या माध्यमातून यशस्वी पदार्पण करुन हे संकुल गुणात्मक वाटचाल करित आहे. राज्यभरातील तज्ज्ञ मार्गदर्शक येथे अध्यापनाचे काम करणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामधून वेगळी दिशा प्राप्त होणार आहे.