Breaking News

जम्मू-कश्मीरला कलम 370 मुळे कायमस्वरूपी विशेष दर्जा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-कश्मीरमधल्या 370 कलमावर महत्त्वपूर्ण तिर्णय दिला आहे. येथे लागू असलेले कलम 370 हे तात्पुरत्या स्वरूपाचे नाही. यामुळेच जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा आहे. अशी स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयात विजयलक्ष्मी झा यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणीवेळी हा निर्णय देण्यात आला आहे. 2017 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने झा यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये विशेष दर्जा देणारे कलम 370 ही रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्यांनुसार, जम्मू-काश्मीरमधील संविधान सभा भंग झाल्यानंतरही 370 हे कलम लागू राहणे हे घटनेच्या मूळ मसुद्याशी छेडछाड करण्यासारखे ठरेल. केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात ऍडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, या कलमावरील बऱयाच याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे यावर लगेचच निर्णय घेणे योग्य नाही. परंतु त्याच वेळी जम्मू-काश्मीरच्या वकिलांनीही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयात जी प्रकरणे प्रलंबित ती कलम 35 ए आणि कलम 370 शी संबंधित नाहीत.