Breaking News

भाजपकडून शिवसेनेला उपसभापतीपदाची ऑफर

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर युती करून आगामी निवडणूका लढवण्यासाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी सुरू असतानाच भाजपने शिवसेनेला राज्यसभेचे उपसभापतीपदाची ऑफर दिली असल्याचे समजते.


भाजपाप्रणित रालोआतून अनेक घटक पक्ष सध्या बाहेर पडत आहेत तर; शिवसेनेने स्वबळाची घोषणा केल्याने भाजपाकडून शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेला मोठी ऑफर दिली असल्याची चर्चा आहे. राज्यात विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्त ठेवणा-या भाजपने शिवसेनेला राज्यसभेच्या उपसभापदीपदाची ऑफर दिल्याचे समजते. तर राज्यात शिवसेनेने स्वतंत्र न लढता युती करून लढण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार लवकरच मातोश्रीवर जाणार असल्याचे समजते. राज्यसभेचे विद्यमान उपसभापती पी. जे. कुरियन हे निवृत्त झाले असून, गेल्या 41 वर्षांपासून हे पद काँग्रेसकडे आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सध्या रालोआला जय महाराष्ट्र करून नव्या राजकीय समिकरण जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नुकतीच भेट घेतली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातुन दररोज मोदी आणि राज्य सरकावर टीका करण्यात येत आहे. सध्याची राजकिय परिस्थिती पाहता शिवसेना भाजपापासून दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाने ही नवी खेळी केली असल्याची चर्चा असतानाच शिवसेनेने ही ऑफर धुडकावल्यास हे पद भाजपा स्वतः जवळ ठेवणार आहे.