Breaking News

वीज व पाणी प्रश्‍नासाठी कान्हुर पठार गावात कडकडीत बंद


पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार प्रादेशिक योजनेसाठी महावितरण कडून तात्काळ वीज जोडणी व शासना कडून दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी माजी जि. प. सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली कान्हुरपठार गाव बंद व महिलांचा हंडा मोर्चा तसेच रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. 

तालुक्यातील कान्हूर पठार व 16 गावांना पेय जल योजनेतून 16 गाव पेय जल योजना तयार करण्यात आली होती. या योजनेचा उपयोग उन्हाळ्यात फक्त तीन महिण्यासाठीच होतो. मात्र प्रशासन व महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ यांच्या अडमुठ्या धोरणांमुळे या योजनेचा फज्जा उडाला आहे. मागील 9 महिने वीज मंडळाने न वापरलेल्या विजेच्या 63 लाख रुपयाचे बिल या 16 गावांच्या माथी मारले आहे. मात्र पावसाळ्यात जर पाणी पुरवठा बंद आहे, तर एवढे बिल कसे याची विचारणा करण्यासाठी कान्हूर ग्रामस्थ व 16 गावचे प्रतिनिधी यांनी अहमदनगर येथे जिल्हा आधिकारी, प्रांत अधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांना याविषयी माहिती दिली. मात्र त्यांनी आंदोलन करणार्‍यांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही, त्यामुळे या आंदोलनाकडे प्रशासनाने मात्र पाठ फिरवली असे दिसतेय. पारनेर तालुक्याच्या तहसिलदार भारती सागरे त्या ठिकाणी उपस्थित होत्या.

 मात्र त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगीतले की, हा वरिष्ट पातळीवरील प्रश्‍न आहे. माझ्याकडे कायदा व सुव्यवस्था एवढेच काम आहे. यावेळी कान्हूर पठार व 16 गावच्या ग्रामस्थांनी भजन, लेझीम, रास्ता रोको, तसेच गाव बंद आंदोलन करून या सरकारचा निषेद केला. तर कान्हूर येथील महिलांनी हंडा मोर्चा काढत या आंदोलनास पाठींबा दर्शवला. तर यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे म्हणाले की, जर आम्ही वीज वापरली नाही, तर कुठले बिल भरणार. तसेच 16 गाव पाणी योजनेत आम्ही तीन महिन्याची वीज बिल अडव्हाँन्स मध्ये भरायला तयार आहोत. मात्र वीज महामंडळ यासाठी तयार होत नाहीय. तर वीज महा मंडळांनी वीज बंद केल्याने पाणी असूनही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. तर जनावरे पाण्याच्या अभावी विक्री करावी लागत आहे. जसे सरकारने व प्रशासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. तर यावेळी जि. प. सदस्य उज्वला ठुबे, सरपंच मंजुळा ठुबे, उपसरपंच शिवाजी शेळके, गोकुळ काकडे, सागर व्यवहारे, माऊली ठुबे, किरण ठुबे, अमोल दिवटे, अरुण ठुबे, अशोक ठुबे, नंदु ठुबे, भास्कर गव्हाणे, आण्णा सोनावळे, अनिल ठुबे, सविता ठुबे, सारिका पोपळघट, कांतीलाल साळवे, सरदार शेख, लता ठुबे आदी तसेच कान्हूरचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच 16 गाव चे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.