Breaking News

तीन महिन्यात पोलिसांना नवीन बुलेटप्रुफ जॅकेटस मिळणार – डॉ. रणजित पाटील


राज्यातील पोलिसांना सुरक्षेसाठी येत्या तीन महिन्यात नवीन बुलेटप्रुफ जॅकेटस मिळणार आहेत. यापूर्वी मागविण्यात आलेले सदोष बुलेटप्रुफ जॅकेटस परत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य आर्कि. अनंत गाडगीळ यांनी नियम ९३ अन्वये राज्यातील पोलिसांना पुरविण्यात येणा-या बुलेटप्रुफ जॅकेटच्या दर्जाविषयीची सुचना उपस्थित केली होती. यावर डॉ. पाटील बोलत होते. राज्यातील पोलिसांसाठी मागविण्यात आलेले बुलेटप्रुफ जॅकेटस देशात एकमेव असलेल्या चंदीगढ येथील परीक्षण संस्थेत परीक्षणासाठी पाठविण्यात आले होते. परीक्षणादरम्यान १४७२ जॅकेटस सदोष आढळून आले. त्यामुळे हे जॅकेटस परत करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या तीन महिन्यात नवीन जॅकेटस मिळणार असल्याचे डॉ. पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.