Breaking News

राष्टीय सेवा योजनेचे शिबि

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने पिंपरी लौकि येथे सात दिवशीय राष्टीय सेवा योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, राष्‍ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन मानललुआ गेलेल्या या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के हागणदारी मुक्त गाव करण्याचा संकल्प करण्यात आला. 

यावेळी राष्‍ट्रीय एकात्मता म्हणजे विविध सामाजिक गटांना एका राष्‍ट्रीय घटकात आणि प्रवाहात सामील करून घेण्याची प्रक्रिया होय असे प्रतिपादन प्रा.औताडे यांनी केले तसेच डॉ.सचिन गोंदकर यांनी कृषी क्षेत्रात व्यापार कसा करावा, कृषी व्यवसायातील संधी आणि आव्हाने याबद्द्ल माहिती दिली. या कार्यक्रमाला अद्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जि. बि खंडागळे, प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी लौकी गावचे सरपंच सौ.अलका गीते आणि कृषी महाविद्यालयाचे उप प्राचार्य. प्रा. निलेश दळे उपस्थिती होते.या शिबिरात बोलतांना डॉ.खंडागळे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेचे सिद्धांत वाक्य आहे, "माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी". त्यामुळे या पुढे सर्वांनी याच उद्देशाने काम केले पाहिजे.या सात दिवसाच्या काळात स्वयंसेवकांसाठी विविध विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते, यामध्ये प्रा.रमेश जाधव यांनी मुलांना राष्ट्रीय सेवा योजनेचे नेमके महत्त्व काय असते हे पटवून दिले व नंतर सहयाद्री ऍग्रोवेटचे श्री.नितीन हासे यांनी "कृषी शिक्षणकडून कृषी उद्योगाकडे" या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी बोलतांना ते म्हणाले की मुलांनी नवीन नवीन कल्पना तयार करून काम केले पाहिजे,आपल्याला जे आवडले ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे मिळाले त्यात आवड निर्माण करा हे रंजक अशा उदाहरणातून पटवून दिले.
या सात दिवसाच्या काळात गावामध्ये वृक्षारोपण,गावाची स्वच्छता, गावामधील ग्रामपंचायत मध्ये जाऊन सर्व बागायती,जिरायती क्षेत्रांची माहिती घेतली आणि गावामधील शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.या शिबिराचे प्रास्ताविक कु.प्रतीक्षा अभंग, ज्योती गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन चि. शुभम राख या स्वयंसेवक यांनी मांडले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वय प्रा.राहुल विखे, प्रा. संतोष वर्पे, प्रा.संदीप पठारे आणि प्रा.प्रवीण गायकर व सर्वे स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले होते.