प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जाचे वितरण
शिर्डी/प्रतिनिधी ;- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेसाठी शिर्डी नगरपंचायतीच्या सुरु केलेल्या स्वतंत्र विभागातून आतापर्यंत ६०० फॉर्म लोकांनी घेतले आहेत. या योजनेअंतर्गत योग्य कागदपत्रांची पूर्तता करून २७० लोकांनी फॉर्म जमा केले आहेत. ही योजना यशस्वी करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो पात्र असेल त्या व्यक्तीच्या नावावर स्वमालकीचे घर नसावे, ही अट आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीची पात्रता प्रधानमात्री आवास योजना ‘सर्वांसाठी घरे’ नागरीच्या मार्गदर्शक तत्वानुसार राहणार आहे. योजना अभियान स्वरुपात कर्ज व्याज सबसिडी घटक वगळता केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविली जाणार आहे. खाजगी भागीदारी द्वारे परवडणाऱ्या घराची निर्मिती करणे या करता बिल्डर यंत्रणेची मदत सुद्धा घेतली जाणार आहे. लोकांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी लवकरात लवकर मेळावा घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.