कोपरगांव: प्रतिनिधी ;- येथील सजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अमित खेबडे व पवन जाधव यांनी यांनी सुयश मिळविले. नाशिकच्या ‘संदीप’ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित आलेल्या राष्ट्रीय शोध निबंध स्पर्धेत ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज (आयओटी) अॅण्ड इटस् फॅसिनेटींग अॅप्लीकेशनस इन स्मार्ट ग्रीड’ (स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञानात आयओटी चे उपयोग) या विषयावर शोध निबंध सादर करण्यात आले. देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. महाविद्यालयाच्या या यशामुळे संजीवनी संशोधन क्षेत्रात विध्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करीत आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे, अशी माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांन दिली.
संजीवनी पाॅलीटेक्निकला प्रथम क्रमांक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:59
Rating: 5