राहता प्रतिनिधी :- येथील प्रितिसुधाजी स्कुलमध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्या आला. संस्थेचे संस्थापक इंद्रभान डांगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की वसंत ऋतूची चाहूल लागताच जीर्ण पाने गाळून गेल्याने झाडे नवीन पालवीचा अंगिकार करतात. झाडांप्रमाणेच माणसांनीही वाईट विचारांचा त्याग करून नवविचारांचा स्विकार केला पाहिजे, असाच संदेश होळी देत असते. होळी हा रंगाचा महोत्सव आहे. होळीप्रमाणेच जीवनात अनेक रंग अंगी भरले पाहिजेत.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणत मनोभावे होळीची पुजा केली. यावेळी विद्यार्थ्यांना पुरणपोळीचे भोजन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी होळी गीतांचे गायन करीत नृत्य केले. यावेळी प्राचार्य ज्ञानेश डांगे, स्नेहलता डांगे, पुनम डांगे, डॉ. गुंजाळ, डॉ. देशमुख, सचिन गिते, शिवाजी देवडे, जालिंदर धनवटे आदींसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
‘प्रितिसुधाजी’मध्ये होळी उत्साहात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:30
Rating: 5