अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य वाटपासाठी पॉस मशीनचा वापर करण्यात येणार आहे. अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने मार्च पासून ही नवीन प्रणाली सुरु करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हापुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी दिली. या प्रणालीच्या वापरासंदर्भात नुकतीच कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवन येथे पार पडली. यावेळी सर्व तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार (महसूल) पुरवठा निरीक्षक , पुरवठा अव्वल कारकून,पुरवठा हिशोबी अव्वल कारकून आदी उपस्थित होते. जालना येथील जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर व जिल्हा पुरवठाअधिकारी संदीप निचित यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हयामध्ये धान्य वाटपासाठी AePDS (Adhar Embled Public Distribution System ) ही नवीन प्रणाली सुरु करण्यात आलीआहे. यात लाभार्थ्यांची आधारबेस ओळख पडताळून त्याला धान्याचे वाटप होणार आहे. आधारबेस ओळख पडताळणी शिवायपॉसद्वारे धान्य वाटप करता येणार नाही. ज्या लाभार्थ्याची आधार क्रमांकाची DCS प्रणाली मध्ये नोंद झाली नसल्यास AePDS प्रणालीमध्ये eKYC द्वारे पॉस मशीनमध्येच आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेचलाभार्थ्याचे मोबाईल क्रमांक मशीनद्वारे टाकणे शक्य होणार आहे.
धान्य वाटपासाठी पॉस मशिनचा 'आधार'
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:30
Rating: 5