सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जांभुळणी येथे बिअरसाठी विशेष ग्रामसभा
म्हसवड (प्रतिनिधी) : माण तालुक्यातील जांभुळणी ग्रामपंचायतीने दि. 6 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. तथापि, पाणीटंचाईसह अनेक प्रश्न गंभीर असताना फक्त बियरबार व परमीट रूमला ना-हरकत दाखला देणे या एकमेव कारणासाठी ग्रामसभा बोलविण्यात आली होती. गावात पिण्याच्या पाण्याची चणचण असताना भलताच विषय अजेंड्यावर घेतल्यामुळे गावात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या भोजलिंग या देवस्थानच्या जवळच असलेले जांभुळणी गाव आहे. तीन हजार लोकसंख्येच्या गावात दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे परिसरातील अनेक कुटुंबं ऊस तोड कामगार म्हणून किंवा इतर कामासाठी दसर्या जिल्ह्यात जातात. पाण्यासह इतरही समस्या या गावासमोर आहेत. गावच्या हद्दीत भोजलिंग डोंगरावर राज्यभरातील हजारो भाविक देवदर्शनासाठी येत असतात.
या मंदिराकडे जाणारी वाट बिकट बनली आहे. सामाजिक संस्थांनी या रस्त्यावर मुरूम टाकला आहे. तरीही अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था असल्याने येथे येणार्या भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गावात दिवाबत्तीसह अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था आहे. गावात अशा अनेक समस्यांच्या असताना जांभुळणी ग्रामपंचायतीने बियर बार व परमीट रूम सुरु करण्यास ना-हरकत दाखला देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे. ग्रामसभेच्या पदाधिकार्यांना ग्रामसभा घेण्यास भाग पाडणार कोण आहे, त्याच्या दबावाखाली येवून ग्रामसभा बोलविली जाते हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
मंगळवारी होणार्या ग्रामसभेकडे सातारा जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या ग्रामसभेला ग्रामस्थ विरोध करण्याच्या तयारी असून कामानिमित्त परगावी असलेले युवक एकवटले आहेत. ही सभा उधळून लावण्याचा निश्चय या युवकांनी केला आहे.