Breaking News

शहर विकासाचा मंजूर निधी पडून : आ. कोल्हे

तालुक्यातील मुख्य रस्त्यांची ३६ कोटी रूपयांची कामे मार्गी लावली आहेत. मतदारसंघाचे दळणवळण चांगले व्हावे, शेतक-यांचा शेतमाल व्यवस्थितपणे शहरात पोहोचावा, औद्योगिक वसाहतीमधील उत्पादकांचे उत्पादन वेळेत मिळावे, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनींबरोबरच नागरिकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी रस्ते वीज पाणी या तीन मुख्य घटकांवर साडेतीन वर्षांत लक्ष देऊन काम केले, याचे समाधान आहे. संजीवनी उद्योग समुह व त्यावर अवलंबुन असणारे सर्वच घटक व बाजारपेठेला चालना देण्यासाठी दळणवळण सुधारत आहोत. 

साईबाबा काॅर्नर ते कोपरगांव रेल्वेस्टेशन या वर्दळीच्या रस्त्याच्या चैपदरीकरणांच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक निधीतून ६ कोटी ९० लाख रूपये मंजूर केले. त्या कामाचे भूमिपुजन आ. कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते.

प्रारंभी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगांवचे सहायक अभियंता संजय कोकणे यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, उद्योजक कैलास ठोळे, कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे राजेंद्र शिंदे, अमृत संजीवनीचे बाळासाहेब संधान, उत्तर नगर जिल्हा सेनेचे कैलास जाधव, गटनेते रविंद्र पाठक, दिलीप वाघ, सुभाष आव्हाड, ज्ञानेश्वर परजणे, त्र्यंबक परजणे, मनेश गाडे, अशोक भाकरे, कामगार नेते मनोहर शिंदे, नारायण अग्रवाल, बापू परजणे, शहराध्यक्ष कैलास खैरे, वैभव आढाव, माजी नगराध्यक्ष बबनराव वाजे आदी उपस्थित होते.