Breaking News

‘जीपीएसटी’ परिक्षेत ‘प्रवरा’चे घवघवीत यश


प्रवरानगर प्रतिनिधी - प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील ४ विद्यार्थी आणि एका शिक्षकाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशपातळीवरील ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) या पूर्व परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ सुनिल निर्मळ यांनी दिली.

फार्मसी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट घेण्यात येते. या पूर्व परीक्षेमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील प्राध्यापक सोमनाथ ठाणगे यांनी १३८ गुण मिळविले. तर विद्यार्थ्यांमधून सुहास तोडमल १८२ गुण, वर्षा तांबे १६५ गुण, योगेश गाडेकर १५८ गुण तसेच प्रतीक करवंजे याने १०४ गुण याने मिळवून यश मिळविले. यासाठी या सर्वांना डॉ. प्रताप पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विरोधीपक्ष नेते नामदार राधाकृष्ण विखे, माजी मंत्री ण्णासाहेब म्हसे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, भारत घोगरे, डॉ. हरिभाऊ आहेर आणि शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.