सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही : राऊत
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात 'सेंद्रिय शेती' या विषयावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक के. पी. नाना आहेर होते. संस्थेचे सचिव भारत घोगरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खंडागळे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऋषिकेश औताडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापनचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर, उपप्राचार्य निलेश दळे आदींसह प्रवरा परिसरातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आहेर म्हणाले, यांनी भविष्यात जर शेती टिकवायची असेल तर सेंद्रिय शेतीच आपल्याला तारेल. सूत्रसंचालन विक्रमसिंह पासले याने केले. प्रा. औताडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अमोल सावंत, प्रा. भाऊसाहेब घोरपडे, प्रा. महेश चंद्रे, प्रा. प्रविण गायकर, डॉ. विशाल केदारी, डॉ. निलेश सोनुने यांनी विशेष परिश्रम घेतले.