पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सुनील देवधर यांना तीन वर्षापूर्वी त्रिपुरामध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून नेमले, त्यांच्या नियुक्तीवेळी त्रिपुरात पक्षाला कोणताही जनाधार नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या 50 पैकी 49 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पण त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी तीन वर्ष त्रिपुराचा सर्व भाग पिंजून काढला. माणिक सरकार यांच्या खुर्चीला हादरवण्यासाठी ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवला. त्यांनी सुरुवातीला त्रिपुरातील तरुणांना पक्षाशी जोडलं. शिवाय, वेगवेगळ्या वर्गातील नागरिक ांच्या भेटी घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भाजपच्या विजयानंतर सुनील देवधर यांचे निकटवर्तीय कपिल शर्मा यांनी सांगितलं की, देवधर यांनी जवळपास सर्व 60 विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौर्यात बूथ कमिटीची बांधणी केली. या कमिट्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न निवडणुकीच्या प्रचार रॅलीमधून मांडले जाऊ लागले.
त्रिपुरातील भाजपचा नायक - सुनील देवधर
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:49
Rating: 5