ट्रॅफिक सिग्नल नसल्याने असुविधा
शहरातील विविध ठिकाणच्या चौकांमधील ट्रॅफिक सिग्नल अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे बर्याचशा चौकांमध्ये वाहनांची कोंडी होत असताना दिसून येत आहे. त्याचबरोबर सिग्नल बंद असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाणदेखील वाढलेले दिसून येत आहे.
प्रसारमाध्यमांमधून अनेकवेळा ट्रॅफिक सिग्नल्स सुरू करण्याची मागणी करण्यात आली मात्र संबंधीत प्रशासनामार्फत याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. परंतू बंद असलेल्या किंवा हवे तेथे सिग्नल नसल्याने अपघातामध्ये जी वाढ होत आहे, यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.