सी.एन.आय. चर्चच्या सभासदांचे उपोषण
सी.एन.आय. चर्चची सभासद वर्गणी 150 रू. आहे. परंतु चर्चचे प्रिस्ट इनचार्ज रेव्ह.देवदत्त कसोटे यांनी कोणताही अधिकार नसतानाधर्म प्रांतच्या कार्यकारणीची सभासद वर्गणी प्रभारी सचिव रुपेश निकाळजे यांच्या पत्रानुसार 480 रु. केली आहे. ही सभासद वर्गणीदि.31 मार्च पर्यंन्त न भरल्यास चर्चचे सभासदत्व रद्द होवून, चर्चच्या संदर्भातील निवडणूक व मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.तर सर्वसाधारण सभेस उपस्थित राहता येणार नसल्याचे जाहिर करण्यात आले आहे. हा निर्णय चर्च व धर्मप्रांताला लागू असलेल्याघटनेच्या ग्रीन बुक व प्रचलित शासकीय कायद्याच्या विरोधात आहे. चर्चच्या वर्गणीधारक सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभाबोलविण्याची मागणी करुन देखील सभा बोलविण्यास हुकूमशाही पद्धतीने नकार देण्यात आलेला आहे. सभासदांच्या धार्मिक हक्काचीपायमल्ली होत असून, धर्म प्रांताचे बिशप किंवा कार्यकारणी सदस्य यांना चर्च सभासद वर्गणी लादण्याचा घटनेनुसार मुळीच अधिकारनसल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे. 10 जानेवारीच्या सभेत ठरल्याप्रमाणे सर्वसाधारण सभा 10 मार्च पुर्वी बोलवावी व वाढीवसभासद फी तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.